1 फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला. या दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्प दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पुढची 5 वर्षे विकासाची संधी देणार असं म्हटलं. या अर्थसंकल्पात अनेक मुद्दे मांडण्यात आले. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट ठेवत, मेक इन इंडियावर भर देण्याचा प्रयत्न करणार असं निर्मला सीतारामण म्हणाल्या बजेटमध्ये गरीब, युवक आणि महिलांकडे विशेष लक्ष दिले गेले.
भूषण गगराणी करणार मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
याचपार्श्वभूमीवर आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या म्हणजेच 4 फेब्रुवारीला सादर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयुक्त आणि प्रशासक म्हणून भूषण गगराणी पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
मुंबईकरांना नेमकं या बजेट मधून काय मिळणार?
तसेच उद्याच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी कर वाढीची शक्यता असून पर्यावरण, प्रदूषण आणि बेस्टसाठी ठोस उपाययोजना करण्याची शक्यता वर्तावली जात आहे. करवाढ वगळता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात सामान्य मुंबईकरांसाठी अनेक सरप्राईजेस असण्याची शक्यता आहे. मुंबईत विविध योजनांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात असेल असं सांगितलं जात आहे.
शिवाय मागील वर्षात तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी यावर्षी बजेटमध्ये वाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच यंदाचा अर्थसंकल्प साधारण 65 हजार कोटी पार करणार अशी शक्यता वर्तावली जात आहे. मुंबईकरांना नेमकं या बजेट मधून काय मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचसोबत सकाळी ११ वाजता मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुपारी 1 वाजता आयुक्त भूषण गगराणी यांची पत्रकार परिषद होणार आहे.
श्रीमंत पालिकेचा उद्या अर्थसंकल्प-
मुंबई पालिकेकडून सुमारे 2 लाख कोटींच्या प्रकल्पाची घोषणा
अर्थसंकल्पात गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, रस्ते दुरुस्तीच्या तरतुदी अपेक्षित
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पाणीपुरवठ्यासाठी बोगद्याचे काम, किनारपट्टीवरील विशेष तरतुदी
दहिसरपर्यंत रस्ता वाढवण्यासाठी तरतुदी अपेक्षित
शिक्षणाचा स्तर, मैदाने आणि बागांची स्थिती सुधारण्यासाठी तरतूद
पाईपलाईन दुरुस्ती, पूल, सांडपाणी व्यवस्था सुधारणेसाठी घोषणा अपेक्षित
दवाखान्यांचा विस्तार, चाचणीसाठी प्रयोगशाळा, रुग्णालयांचा विस्तार अपेक्षित